75th Birthday Wishes in Marathi || 75th, 61st Birthday Marathi Celebration

: - . , . . -

61st Birthday Wishes in Marathi

How to Celebrate 60th Birthday in Marathi

एकसष्ठी आणि पंचाहत्तरी कशी साजरी करावी :

आजकाल लहान मुलांचे वाढदिवस त्यांचे आई-वडील खुप प्रेमाने आणि धुमधडाक्यात साजरे करतात. काही वर्षांपूर्वी वाढदिवस घरच्या घरी आणि जवळच्या पाहुण्यांना बोलवून साजरा केला जायचा, पण पैसा आला आणि लोक तो पैसा खर्च करण्यासाठी वेगवेगळी कारणे शोधून काढू लागले. त्यातूनच थाटामाटात वाढदिवस साजरे करण्याची कल्पना रुजू झाली. नंतर-नंतर तर लहानांसोबत मोठ्यांचाही वाढदिवस उत्साहाने साजरा केला जाऊ लागला.

आज-काल एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे पण तरीही काही सणांच्या निमित्ताने, कोणत्यातरी समारंभाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र जमतात आणि नात्यांना नवीन उजाळा देतात. म्हणूनच घरातील वयस्कर लोकांचे वाढदिवस सर्वजण खूप उत्साहाने साजरे करतात. त्यातल्या त्यात एकसष्ठावा (६१) वाढदिवस आणि पंचाहत्तरावा (७५) वाढदिवस हा जरा जास्तच उत्साहाने साजरा केला जातो. जिथे माणसाला तो उद्याचा दिवस पाहणार की नाही हे सुद्धा माहीत नसते, तिथे एखाद्या वयोवृद्ध माणसाने आयुष्याची ६१ किंवा ७५ वर्ष पार करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय यामुळे घरातील वयस्कर माणसांना आपुलकी मिळते.

आजकालचे आपले जीवन पूर्वीप्रमाणे काबाडकष्टाचे राहिलेले नसले तरीही खूप धकाधकीचे आहे, मानसिक ताण खूप जास्त आहे. महागाई वाढली आहे. त्यामुळे घरातील मुलांसोबतच घरातील सुना सुद्धा नोकरी करतात. मुले शाळेत जातात, नंतर क्लासला जातात, वेगवेगळ्या छंदवर्गांना जातात, खेळण्यासाठी जातात, मित्राकडे जातात आणि जेव्हा हे सगळे लोक घरी असतात तेव्हा त्यांचा जास्त वेळ मोबाईलवर फेसबुक किंवा टीव्हीवर सिरियल्स बघण्यामध्ये जातो. त्यामुळे घरातील वयस्कर लोकांना एकटेपणा जाणवू लागतो. याची उणीव भरून काढण्यासाठी बरेचसे लोक विविध मंडळे तयार करतात, परंतु बाहेरच्या लोकांना घरच्या लोकांची सर येत नाही. त्यामुळे जेव्हा एखादा सण येतो आणि सर्वजण एकत्र येतात, तेव्हा आपल्या घरातील वयोवृद्ध माणसांना खूप आनंद होतो. ते अशा क्षणांची वाट बघत असतात. अशा वेळी त्यांचा वाढदिवस साजरा करणे हा देखील एक खूप मोठा सण असतो.

मराठी रिती-रिवाजाप्रमाणे एकसष्ठावा आणि पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा करताना, खूप मोठा समारंभ केला जातो. जवळच्या नातेवाईकांना निमंत्रणे पाठवली जातात. साग्र-संगीत जेवणाचा बेत आखला जातो. घरातील लहान-मोठे सर्व सदस्य वाढदिवसाच्या तयारीला लागतात. कोण काय करणार, कोण काय आणणार हे ठरवले जाते. एखाद्या लग्न समारंभासारखा किंवा मुंजीसारखा हा दिवस खूप उत्साहाने साजरा केला जातो. ज्या आईवडिलांनी आपल्याला अत्यंत कष्ट करून वाढवले आहे त्यांच्यासाठी काहीतरी चांगले करणे आणि आपल्याला जरी वेळ नसला तरीही आपण त्यांच्या त्यागाला, कष्टाला विसरलो नाही हे सर्वांना दाखवून द्यायचे असते. सर्वजण स्वतंत्र कुटुंब पद्धतीने राहत असल्यामुळे, या दिवसाच्या निमित्ताने सर्व मुले, मुली, सुना, जावई आणि नातवंडे एकत्र येतात आणि घर भरून जाते. हे पाहून घरातील वयस्कर माणसांचे डोळे आणि मन भरून येते.

हा दिवस साजरा करण्यासाठी काही खास रीतीरिवाज नसले तरीही लोक हा दिवस आपापल्या परीने साजरा करून त्याला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न करतात. जर घरातील आई-वडिलांना आध्यात्मिक ओढ असेल, तर या दिवशी पूजा ठेवली जाते आणि त्यांच्याकडून पूजा करून त्यांना समाधान लाभेल असे केले जाते. आजी आजोबांच्या वाढदिवसासाठी सर्वात जास्त उत्साही असतात, ती म्हणजे त्यांची नातवंडे. या दिवशी जुन्या फोटोंना गोळा करून त्याचे छानसे कोलाज बनवून आजी आजोबांना भेट दिल्यास त्यांना खूप आनंद होईल किंवा अशा फोटोंचे एखादे प्रेझेंटेशन बनवून ते त्यांना टीव्हीवर किंवा प्रोजेक्टवर दाखवले तर जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. त्या फोटो मागच्या गोष्टी किंवा मजेदार गमती सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतील. हे फोटो बघताना त्यांचे मन भूतकाळातील सुंदर आठवणींमध्ये रमून जाईल. वाढदिवसाच्या दिवशी याहून सुंदर भेट काय असू शकेल?

शिवाय या दिवशी घरातील सर्व मंडळींनी ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीकडून आपण काय शिकलो किंवा त्यांचे विचार आपल्याला आयुष्यात कसे उपयोगी पडले, त्यांनी दिलेल्या शिकवणुकीचा आपल्या जीवनामध्ये कसा फायदा झाला हे जर सांगितले तर त्या व्यक्तीला खूप समाधान मिळेल. आपण आपल्या मुलांना शिस्त लावली, त्यामुळे त्यांचा फायदा झाला आणि हे त्यांच्या लक्षात आहे हे समजल्यानंतर त्यांना त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाल्याप्रमाणे वाटते. याशिवाय जर एखाद्याला कविता करता येत असेल किंवा नेटवरून सुंदर कविता मिळाली तर घरातील छोट्या नातवंडांकडून ही कविता बोलून घ्यावी, आजी-आजोबांना याचे फार कौतुक वाटेल.

हा दिवस वेगळेपणाने साजरा करायचा असेल तर त्यांच्या वाढदिवसाच्या आधी नकळत त्यांच्याकडून गप्पा मारता-मारता हे जाणून घ्यावे की, आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांना करायची होती पण काही कारणास्तव राहून गेली. तुम्हाला हे जाणून खूप आश्चर्य वाटेल की आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी किती गोष्टींचा त्याग केला आहे. जी गोष्ट त्यांना करायची खूप इच्छा होती पण ते करू शकले नाहीत अशी गोष्ट जाणून घेतल्या नंतर आपण त्यांना वाढदिवसाच्या दिवशी तसे करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. जसे की, एखाद्या ठिकाणी फिरायला जाणे, केवळ जोडप्याने मिळून नाटक बघायला जाणे. एखाद्याला गाण्याची आवड असेल तर त्यांच्यासाठी संगीताचा कार्यक्रम ठेवणे. आजकाल बरेच ट्रॅव्हल एजन्सी वाले वृद्ध माणसांसाठी सहली ठेवतात, अशा सहलींना गेल्यानंतर तेथील घरातील वयस्कर मंडळीना खूप आनंद मिळतो. त्यांचे पूर्ण आयुष्य मुलांसाठी आपल्या इच्छा मारण्यातच गेलेले असते. म्हणून त्यांना कोणत्याही खर्चाचा विचार न करता निव्वळ आनंद मिळेल अशा ठिकाणी घेऊन जाणे. पण सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे हे की त्यांना सांगावे की आपण त्यांचा किती आदर करतो, त्यांच्यावर किती प्रेम करतो आणि जीवनात कितीही कटू प्रसंगांना सामोरे जावे लागले तरीही आपण त्यांचा त्याग कधीही विसरणार नाही.

75th and 60th Birthday Wishes in Marathi : Gift Ideas / Shastipurthi Invitation

Related posts

Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी सुविचारSad Quotes in Marathi | Marathi Sad Dukhi Status & Thoughts दुःखी विचारNaming Ceremony Information in Marathi, Name Invitation, Quotes, IdeasMarathi Charolya - College | कॉलेज चारोळ्याLove Quotes in Marathi | Marathi Romantic Love Shayari Status II प्रेमावर मराठी सुविचार व शायऱ्याGood Thoughts in Marathi | मराठी सुविचारEngagement Wishes in Marathi Language | Sakharpuda Shubhecha | SMSNirop Samarambh Information in Marathi | Farewell Speech on Send offInspirational Quotes in Marathi | प्रेरणादायी वचने / सुविचार

ncG1vNJzZmivp6x7rq3RmquhoV6pw3DAyKmqZqGem7yzucCtoKimXZ67brnAq5itoJlkg3K%2F02ZubqyYYq%2BqvtOhm5qxXw%3D%3D

 Share!